चेन्नई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमवल्या. मात्र या परिस्थितीतून पुन्हा हळूहळू उभं राहण्याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत. काहीजणांना ऑक्सिजन वेळेवर न पोहोचल्यानं जीव गमवावाव लागला. तर काही जणांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने. एका महिलेनं ऑक्सिजन वेळेत प्रत्येकापर्यंत पोहोचावा या उद्देशानं ऑक्सिजन ऑटो सुरू केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईत राहणाऱ्या या 36 वर्षीय महिलेनं तिच्या आईला ऑक्सिजन अभावा गमवलं. आपली आई आपल्याला सोडून गेली याची खंत होतीच पण तिच्या आठवणीत सीता देवी यांनी ऑक्सिजन रिक्षा सुरू केली. सीता देवी यांच्या आईचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. त्यांच्यावर गर्वमेंट जरनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 


सीता देवी यांच्या आईला 12 तास ऑक्सिजन बेडसाठी वाट पाहावी लागली मात्र तोपर्यंत त्यांच्या आईनं प्राण सोडले होते. त्यांनी आपल्या आईच्या आठवणीत रिक्षामधून रुग्णालयात ऑक्सिजन पोहोचवण्यास सुरूवात केली आहे. या कामामध्ये त्यांची दोन वॉलेंटियर्सनी साथ दिली. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत गरजू लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम त्या करत आहेत. त्यांच्या या कामाला कडक सॅल्युट अनेकांनी केला आहे. 


आपली आई गमवली पण दुसऱ्या कुणाची आई जग सोडून जाऊ नये म्हणून त्यांनी ऑक्सिजन ऑटोद्वारे मदत करण्याचा निर्धार केला. त्यांनी 800 लोकांचा आतापर्यंत जीव वाचवला आहे.