हैदराबाद : हैदराबाद विद्यापिठ परिसरात एका विद्यार्थिनीवर बलात्काराच प्रयत्न झाल्याचे खळबळजनक प्रकरण पुढे येत आहे. विद्यापिठातील विद्यार्थिनीसोबत शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून तुपास सुरू केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


विद्यार्थिनीच्या शरीरावर काही जखमा


दरम्यान, विद्यापिठानेही प्रकरणाची गंभीर दखल घेत एक अंतर्गत उच्चस्तरिय समितीन नेमली आहे.  प्राप्त माहितीनुसार, विद्यापीठ परिसरात चार अज्ञात व्यक्तिंनी २१ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तसेच, तिच्यावर बलात्कार करायचाही प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत विद्यार्थिनीच्या शरीरावर काही जखमाही झाल्याच्या खुणा आहेत. तसेच, मुलीचा बचाव करण्यासाठी पुढे आलेला तिचा सहकारीही या झटापटीत जखमी झाला.


आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल- पोलीस


सहाय्यक पोलिस आयुक्त, (मधापुर डिव्हिजन) एन श्याम प्रसाद राव यांनी सांगितले की, विद्यापिठातील निर्जन ठिकाणी शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. आरोपींच्या तावडीतून सुटल्यावर विद्यार्थिनी आणि तिच्या सहाऱ्याने विद्यापिठातील आपले इतर मित्र आणि विद्यापिठ प्रशासनाला माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा आशावादही राव यांनी व्यक्त केला.