धावत्या ट्रेनमध्ये आईचं लक्ष फोनकडे, मुलगी टॉयलेट सीटमध्ये अडकली; मग...
Trending News In Marathi: आईच्या निष्काळजीपणा चार वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतला असता. आईचे फोनमध्ये लक्ष असताना मुलीवर मात्र संकट ओढावले होते.
Trending News In Marathi: आईचा निष्काळजीपणामुळं एका चिमुकलीचा जीव धोक्यात आला होता. बरौनी-बांद्रा अवध एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एक महिला तिच्या चिमुकल्या मुलीसोबत प्रवास करत होती. त्याचवेळी प्रवासात असं काही घडलं की मुलगी जीवाच्या आकांताने ओरडत होती. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदत करत तिला बाहेर काढले आहे.
आई फोनमध्ये बिझी झाली अन्...
अवध एक्स्प्रेसमधील एसी कोच नंबर C6मध्ये महिला तिच्या 4 वर्षांच्या मुलीसह प्रवास करत होती. त्याचवेळी मुलीला शौचास जायचे होते. आईने मुलीला ट्रेनमधील शौचालयात घेऊन गेली. त्याचवेळी तिला एका नातेवाईकांचा फोन आला तेव्हा ती शौचालयाच्या बाहेर उभी राहून गप्पा मारत होती. बराचवेळ महिला शौचालयाच्या बाहेर उभी राहून बोलत होती. त्याचवेळी ट्रेन धावती असल्यामुळं चिमुकलीचा पाय टॉयलेटच्या सीटमध्ये अडकला.
प्रवासी धावले मदतीला
टॉयलेटच्या सीटमध्ये पाय अडकल्याने मुलगी वेदनेने विव्हळत होती. मुलीचा आवाज ऐकून आईने धावत जाऊन शौचालयाचा दरवाजा उघडला. ट्रेनमध्ये असलेल्या अन्य प्रवाशांनाही धाव घेतली. सगळ्यांनी तिचा फसलेला पाय काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका प्रवाशाने रेल्वे हेल्प लाइनला फोन नंबर 139वर फोन करुन घटनेची सुचना दिली. घटनेची सुचना मिळाल्यानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेचच टेक्निकल स्टाफला फोनकरुन घटनेची माहिती दिली.
दीड तास टॉयलेटमध्येच अडकला होता पाय
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या सीतामढी जिल्हातील रहिवासी मोहम्मद अली पत्नी फातिमा आणि मुलीसोबत अवध एक्स्प्रेसने प्रवास करत होते. याचवेळी फातिमाच्या थोड्या निष्काळजीपणामुळं मुलीच्या जीवावर बेतले होते. आई फोनवर गप्पा मारण्यात बिझी झाली होती त्याचवेळी मुलीचा पाय टॉयलेटमध्ये फसला. जवळपास दीड तास मुलीचा पाय त्याच अवस्थेत होता आणि ट्रेन तितका वेळ स्टेशनवर थांबवण्यात आली होती.
वेदनेने तडफडत होती चिमुकली
रेल्वेच्या टेक्निकल स्टाफने घटनास्थळी जाऊन टॉयलेट बॉक्स खोलून मुलीचा पाय बाहेर काढला आहे. पाय बाहेर काढल्यानंतरही मुलगी वेदनेने तळमळत होती. तिच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. पायाला मलमपट्टी केल्यानंतर तिला थोडा आराम वाटला. 15 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. मुलीची प्रकृती स्थिर असून तिला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.