या जिल्ह्यात एकाच वेळी 40 लोकांना HIV ची लागण
जिल्ह्यातील 40 लोकांना एकाचवेळी HIV ची लागण.
मुंबई : जिल्ह्यातील 40 लोकांना एकाचवेळी HIV ची लागण.
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात एकाच वेळी 40 नागरिकांची एड्स टेस्ट पॉझिटिव्ही आली आहे. 2017 च्या नोव्हेंबर महिन्यातील जिल्ह्याच्या आरोग्य कॅम्पमधील हा रिपोर्ट आहे. असं सांगितलं जात आहे की, उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या बनावट डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे एचआयव्ही झाल्याचं सांगितलं जात आहे.
एकच इंजेक्शन वापरल्यामुळे झाला एड्स
मीडिया रिपोर्टनुसार, एचआयव्ही पीडितांच्या माहितीनुसार सुरूवातीला ते लोकल डॉक्टरांकडे जायचेय हे डॉक्टर त्यांना एकाच इंजेक्शनचा वापर करत असतं. तसेच एक सारखीच औषध देत असतं. यामुळेच त्यांना एचआयव्हीची लागण झाली असल्याचं म्हणणं आहे. या प्रकरणी बांगरमऊच्या काऊंसलर सुनील यांचे म्हणणे आहे की, आम्हाला 40 एचआयव्ही पॉझिटीव्ह केस मिळाल्या आहेत. जर या प्रकरणाची कसून चौकशी केली तर हा आकडा 500 च्यावर जाण्याची शक्यता आहे.
पोलीस करणार चौकशी
युपीचे मेडिकल सुपरिटेंडेंट प्रमोद कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यासाठी हेल्थ कॅम्प लावला जाईल.