`३ वर्षात ४० लाख नोकरी उपलब्ध होणार`
उत्तर प्रदेशमध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करण्यासाठी योगी सरकार हरएकपरीने प्रयत्न करीत आहे.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करण्यासाठी योगी सरकार हरएकपरीने प्रयत्न करीत आहे.
यासाठी इन्वेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले आहे.
४० लाख युवकांना रोजगार
पुढच्या ३ वर्षात ४० लाख तरुणांना रोजगारभिमुख करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री योगी यांनी सांगितलं.
योगी सरकार सध्या 'वन डिस्ट्रिक्ट, वन प्रोडक्ट' योजनेवर काम करत आहे. सरकार सध्या पूर्वांचल एक्सप्रेस वे आणि बुंदेलखंड एक्सप्रेस वेचे काम वेगाने करत असल्याचे सांगण्यात आले.
गुंतवणूकदारांना प्रोत्साहन
तरुण आणि महिलांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी देण्याच्या दिशेने काम सुरू आहे.
गुंतवणूकदारांची काळजी दूर करण्यासाठी प्रदेश सरकारने गेल्या ११ महिन्यांपासून काम सुरू केलयं. उद्योगपतींनी गुंतवणूक करावी यासाठी अनेक योजनादेखील आखल्या आहेत.