Goa Kala Academy:  गोवा कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर हॉलमधील  एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडओत हॉलच्या छटामधुन पाणी गळत असल्याचे दिसत आहे. तर, हॉलमधील एका सीटखाली साप आढळल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. नुकताच या कला अकादमीचा  पुनर्विकास करण्यात आला आहे. मात्र, येथील काम पाहता  पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा सरकारतर्फे नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. देश-विदेशातील कला प्रेमी यात सहभागी झाले होते. चित्रपटसृष्टीतील लोकांचे स्वागत करण्यासाठी  चित्रपट महोत्सवादरम्यान या कला अकादमीचे सरकारने तातडीने नूतनीकरण केले. मात्र, अत्यंत घाईघाईत केलेल्या या कामामुळे दर्जाबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोवा कला अकादमी हा ऐतिहासिक वारसा असून हेरिटेज श्रेणीत गणला जातो. गोव्यातील या ऐतिहासिक वारसा असलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी सरकारने खर्च केलेल कोट्यावधी पाण्यात गेल्याचे दिसत आहे. 


गोवा कला अकादमीच्या पुनर्विकासाच्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिराच्या सभागृहाचे छत गळत असल्याचा कथित व्हिडिओ  व्हायरल झाला आहे.  सभागृहातील सीटच्या खाली एक साप आढळून आल्याचा कथित व्हिडीओही व्हायरल झाला आहे. 


दोन महिन्यांपूर्वीच झाले लोकार्पण 


गोवा कला अकादमी पुनर्विकास केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच याचे लोकार्पण करण्यात आले. पुनर्विकासाच्या कामावर 400 कोटी खर्च करण्यात आले आहेत.  या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीने  सरकारवर निशाणा साधला आहे. गोवा सरकारने अर्धवट पुनर्विकास झालेल्या कला अकादमीचं उद्घाटन केलं. अकादमीची छत कोसळलेली आहे. या कला अकादमीच्या पुनर्विकासावर 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. एवढा पैसा खर्च करूनही कला अकादमीची अवस्था पूर्वीसारखीच आहे.गोवा कला अकादमी पुनर्विकास कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील आम आदमी पार्टीने  सरकारवर केला आहे. या कला अकादमीचा पुनर्विकास करण्यासाठी कोणतंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं असा आरोप देखील आम आदमी पार्टीने  सरकारवर केला आहे. कोणत्याही निविदा प्रक्रियेशिवाय हा पुनर्विकास करण्यात आला असल्याचा दावा आम आदमी पार्टीने केला आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे जनरल सेक्रेटरी दुर्गादास कामत यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत गोवा सरकारला धारेवर धरले आहे.