नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. गेल्या 24 तासातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 17 हजारांच्या जवळपास गेला आहे. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 24 तासात 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,73,105 इतकी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार,  गेल्या 24 तासात देशात 16,922 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या देशात 1,86,514 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 2,71,697 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 14,894 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



 


मोदी सरकारचे ५ महत्त्वाचे निर्णय; कोट्यवधी भारतीयांना होणार फायदा


महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3890 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1,42,900 इतकी झाली आहे. तर राज्यात एकूण मृतांची संख्या 6739वर गेली आहे. 


दिल्लीत गेल्या 24 तासात 3788 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 70 हजारांवर पोहचली आहे. तर एकूण 2365 जणांचा मृत्यू झाला आहे. 


आंध्रप्रदेश 10,331, आसाम 6198, बिहार 8209, गोवा 951, गुजरात 28,943, हरियाणा 12010, जम्मू-काश्मीर 6422, कर्नाटक 10118, केरळ 3603, लडाख 941, मध्य प्रदेश 12448, ओडिशा 5752, पंजाब 4627, राजस्थान 16009, तमिळनाडू 67,468, तेलंगाणा 10444, उत्तर प्रदेश 19,557, पश्चिम बंगालमध्ये 15,173 कोरोना रुग्ण आढळले आहेत.


भारतीय अर्थव्यवस्थेत यावर्षी मोठ्या घसरणीची शक्यता; IMF अहवालात खुलासा