नवी दिल्ली : गेल्या काही तासात भारतात कोरोनाचे 45,903 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता देशात संक्रमित लोकांची संख्या 85,53,657 वर पोहोचली आहे तर मृतांचा आकडा 1,26,611 वर पोचला आहे. सध्या 5,09,673 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 48,405 नवीन रूग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 79,17,373 पर्यंत पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. यापूर्वी देशात एका दिवसात 85 हजारापर्यंत देखील रुग्णवाढीची संख्या पोहोचली होती. रुग्णांची वाढ कमी होत असली तर धोका अजूनही कायम आहे. इतर देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे काही देशांना पुन्हा लॉकडाऊन करावे लागले. भारतात अजून दुसरी लाट आलेली नाही.



महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक संक्रमित रुग्ण आहेत. राज्यात कोरोना संक्रमणाचा आकडा 17,14,273 पर्यंत पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 45,115 वर पोचला आहे. अमेरिका हा जगातील सर्वात मोठा संक्रमित देश आहे, तर त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.


देशात सरकारकडून खबरदारी घेण्याचा सल्ला वारंवार देण्यात येत आहे. ज्या वेगाने प्रकरणे पुढे येत आहेत त्यामुळे कोरोना चाचणी देखील वाढली आहे. आतापर्यंत देशात 11.77 कोटींपेक्षा जास्त नमुन्यांची कोरोना तपासणी झाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारपर्यंत देशात 11,77,36,791 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी दोन दिवसांपूर्वी 11,94,487 चाचण्या घेण्यात आल्या.


कोरोनावर अजूनही प्रभावी अशी लस मिळालेली नाही. त्यामुळे जगात कोरोनाचं संकट कायम आहे. व्हायरसची लागण कमी होण्यासाठी अंतर राखणं महत्त्वाचं आहे. पण अनेक ठिकाणी असं होत नसताना पाहायला मिळालं आहे.