मुंबई : आपल्याला थोडं डोकं दुखलं किंवा जरा आजारी पडलो तरी सहन होत नाही. मात्र एक महिला तब्बल तिच्या वजनाच्या जवळपास ट्युमर पोटात घेऊन होती. हे वाचून आश्चर्य वाटेल मात्र ही घटना घरी आहे. या महिलेचे प्राण डॉक्टरांनी वाचवले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजनाएवढा महिलेच्या पोटात असलेला ट्युमर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढला. या महिलेला जीवदान दिलं. ही घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टरांना देव का म्हणतात हे अधोरेखित झालं आहे. डॉक्टरांनी या महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करून  तब्बल 47 किलो वजनाचा ट्युमर काढला..


ही धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयात घडली आहे. डॉक्टरांच्या पथकाने महिलेला नवजीवन दिलं.  या ट्युमरमुळे महिलेचं वजन जवळपास दुप्पट झालं होतं. त्याचवेळी 47 किलोच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेचे वजन 49 किलो असल्याचं समोर आलं आहे. ही महिला 18 वर्षांपासून हा ट्युमर पोटात घेऊन फिरत होती. 


या महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला हा ट्युमर मोठा नव्हता. मात्र नंतर पोट दिवसेंदिवस फुगत चाललं. 2004 मध्ये सोनोग्राफी केली तेव्हा समजलं की ट्युमर आहे. त्यावेळी डॉक्टरांनी ही शास्त्रक्रिया जोखमीची असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्ष अत्यंत बिकट परिस्थिती होती. 


आईची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. अखेर मुलानं आपल्या आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. 27 जानेवारीला महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 4 तासांच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्युमर काढण्यात यश आलं. 8 डॉक्टरांच्या टीमने मिळून ही शस्त्रक्रिया केली होती.