बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार बनवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजप 22 व्या राज्यात सरकार स्थापन करणार आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या विजयामुळे भाजपला येणाऱ्या काळात आणखी फायदा होणार आहे.


भाजपला होणार हे 5 फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. कर्नाटकाच्या विजयाचा फायदा भाजपला या राज्यांमध्ये होणार आहे.


2. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या विजयाची शक्यता वाढेल. मोदींची लाट ओसरत चालली आहे हा विरोधी पक्षाचा दावा कर्नाटक निवडणुकीत चुकीचा ठरला आहे.


3. मोदींच्या काळात दक्षिणात भाजपचं पहिलं सरकार बनणार आहे. दक्षिण भागात यामुळे भाजपला पक्ष वाढवण्यात मदत होईल.


4. याआधी मुख्यमंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम करणारे येदियुरप्पा यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या हिशोबाने काम करतील.


5. . चंद्रबाबू नायडू याआधीच एनडीए सरकारमधून बाहेर पडले आहेत. शिवसेना देखील भाजपवर सतत टीका करत आहे पण आज पराभव झाला असता तर इतर सहयोगी पक्षांनी देखील भाजपवर उघडपणे टीका केली असती.