मुंबई : देशात कोरोनामुळे एकूण 590 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एकूण रूग्णांची संख्या 18 हजार 601 झाली आहे. संसर्गाच्या अपेक्षेने सर्व केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि कार्यालयेची कॅन्टीन त्वरित बंद केली गेली आहे. दुसरीकडे, सर्वाधिक प्रभावित मुंबईत 53 पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. देशात कोरोना रुग्णांची संख्या 18601


दिल्लीतील रूपनगरच्या रेशनच्या दुकानात काम करणाऱ्याला कोरोना झाल्याचं कळतं आहे. ज्याचा प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता आणि हॉटस्पॉट क्षेत्रात देखील गेला नव्हता. त्यामुळे आता रेशन घेऊन गेलेल्या दीड हजार लोकं देखील संसर्गग्रस्त झाले आहेत का याबाबत चिंता वाढल्या आहेत.
 
2. अमेरिकेत कच्चं तेल शून्य डॉलरच्या खाली


अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) बाजारपेठेतील कच्चं तेल सोमवारी प्रति बॅरल 37.63 डॉलरवर घसरले आहे. जगभरातील लॉकडाऊन असल्याने मे महिन्यासाठी फ्युचर्स डील करणारे व्यापारी आता ते घ्यायला तयार नाहीत. कच्च्या तेलाची ही घसरण जगासह भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी नाही.


3. कोरोना संकटावर ट्रम्प यांचा मोठा निर्णय


कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या अमेरिकेने कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी ही मोठी घोषणा केली आहे. आता पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला अमेरिकेत स्थायिक होण्यास परवानगी दिली जाणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा मोठा निर्णय जाहीर केला. डोरोल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.


4. पहिल्या 70 ते 80 दिवसातील परिस्थिती


यावर्षी 30 जानेवारीला केरळमधून भारतात पहिला कोरोनाचा रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. त्याच्या 80 व्या दिवसापर्यंत, भारतात 16000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 519 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत वगळता असे बरेच देश आहेत ज्यात पहिल्या रुग्णानंतर 70 ते 80 दिवसात स्थिती फारच बिघडली आहे.


5. कोरोनाचं संकट संपताच चीनला बसणार मोठा धक्का


कोरोना विषाणूमुळे जगाची अर्थव्यवस्था ढासळताना दिसत आहे. पण या वातावरणातही भारतासाठी चांगली बातमी आहे. वास्तविक, चीनमध्ये कार्यरत सुमारे 1000 कंपन्या आता भारतात संधी शोधत आहेत. 1000 विदेशी कंपन्या भारतात प्रवेश करण्याचा विचार करत आहेत. यापैकी जवळपास 300 कंपन्या भारतात कारखाना उभारण्याच्या मनःस्थितीत आहेत. यासंदर्भात शासकीय अधिकार्‍यांशी बोलणीही सुरू आहे.