Money Saving Tips: आपण बऱ्याचदा गरज नसताना वायफळ खर्च करत असतो आणि हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुमचे स्वत:वर नियंत्रण नसते. अशावेळेस स्वत:साठी काही नियमांची आखणी करता आली पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यावर आणि खर्चांवर नियंत्रण ठेवायचे असल्यास तुम्हाला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याविषयी आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत...(5 Money Rules For Everyone NZ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. तुमच्याजवळ नेहमीच 1 वर्षाचा इमरजन्सी फंड हा कॅशमध्ये असावा. जेणेकरुन एखादी अचानक समस्या आल्यास तुम्हाला त्याचा वापर करता येईल. पण जर कोणतीही समस्या नाही आली तर तुमची तेच पैसे सेव्ह राहतील आणि गरज असल्यास तुम्ही भविष्यात त्याचा वापर करु शकाल. 


 


2. तुमच्या पगारातील 40% हा स्वत: वर, तुमच्या गरजांवर खर्च करावा पण उर्वरित 60% तुमची गुंतवणूक असली पाहिजे. त्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहण्यास मदत होते. आपण जेव्हा वयाने वाढू लागतो तेव्हा स्वप्न आणि जवाबदाऱ्यांचा भडीमार होत असतो. मग अशावेळेस मोठी रक्कम मिळवणे कठीण होते. त्यावेळेस तुम्ही केलेली गुंतवणूक ही तेव्हा तुमच्या कामी येते. अनेकदा पोटाला चिमटा काढल्यास त्याचा पुढे जाऊन चांगलाच फायदा मिळतो. 


 


3. लग्न करताना योग्य व्यक्तीची निवड  करा. तुम्ही जर एका जवाबदार व्यक्तीचा आयुष्यात विचार करता तेव्हा त्यात तुमची गुंतवणूक सुरु होते. जर तुमच्या पार्टनरचा उधळपट्टीकडे जास्त कल असेल तर त्याचा तुमच्या सेव्हीगंवर फरक जाणवतो. साहजिकच मग अशावेळेस चीडचीड होते. एकट्यावर भार पडतो. त्यामुळे अशाची निवड करा जो पैशांचे महत्त्व समजत असेल. कमवते तुम्ही असाल किंवा तुमचा पार्टनर असेल पण पैशांची उधळण करताना दोघांना समजले पाहिजे. 


आणखी वाचा... माझ्याशी लग्न कर... मुलीने नकार देताच मुलाने जे केलं त्याने गाव हादरलं!


4. अशा लोकांच्या संगतीत रहा ज्यांचा तुम्हाला फायदा होईल. त्यांच्यामुळे तुम्ही कायम प्रेरित रहाल. तुम्हाला त्या लोकांचा फायदा करुन घेता आला पाहिजे. 


आपल्या आयुष्यात सकारात्मक लोक खूप कमी असतात पण नकारात्मक लोकांचा वावर सर्रास पाहायला मिळतात. मग ज्यांच्याकडून काही शिकायला मिळते त्यांच्याकडून शिकून घ्या. 


 


5. तुमच्या महत्त्वाच्या गरजांची यादी तयार करा. जेणेकरुन खर्च करताना तुम्हाला भान राहिल. जसं की तुमचं घरभाडे, लाईट बिल, प्रवासाचा खर्च, दवाखान्यातील खर्च इत्यादींची यादी तयार करा. आणि त्याप्रमाणे खर्च करा. तुमचे आपोआप अनावश्यक खर्च टळले जातील.


पैसे कमवताना जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षाही कमी वेळ पैसे खर्च करताना लागतो हे सोपं गणित प्रत्येकाला समजले तर अशी वेळ येत नाही. याचा अर्थ असा नाही की मन मारुन जगायचे. जिथे गरज आहे तिथेच पैसे खर्च करा. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)