मुंबई : चार राज्यातील निवडणुकांमध्ये (Assembly Elections Results 2022) मिळालेल्या यशामुळं भाजपमध्ये (BJP) आनंदाचं वातावरण आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) अस्वस्थता पसरलीय. या विधानसभा निवडणूक निकालांचा महाराष्ट्रातल्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, पाहूयात हा रिपोर्ट. (5 state assembly elections results 2022 what effect on maharashtra political scenario)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपनं देदिप्यमान विजय मिळवला. महाराष्ट्राचं शेजारी राज्य असलेल्या गोव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं निवडणूक लढवली. तिथंही भाजपचीच सत्ता आल्यानं महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.'यूपी, गोवा झाँकी है, अब महाराष्ट्र बाकी है', अशी थेट घोषणाच भाजपनं दिलीय.



यावर शरद पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. काय म्हटले आहेत पवार त्यांच्याच तोंडून ऐकूयात.


शरद पवार असं म्हणत असले तरी भाजपच्या यशामुळं महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरलीय. महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात आघाडीची मोट बांधण्यात शरद पवारांनी पुढाकार घेतला. मात्र गोव्यातील निवडणुकीत काँग्रेसनं राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सोबत न घेता, एकट्यानं निवडणुका लढवल्या. त्याचा फटका काँग्रेसला बसला. काँग्रेसबद्दलची ही नाराजी पवारांनीही अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.


महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून  महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष चांगलाच तापलाय. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपनं त्यांच्या राजीनाम्यासाठी जोर लावलाय. आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईडी कारवाईची टांगती तलवार लटकतेय.  


महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार असल्याचं भाकीत भाजप नेत्यांकडून केलं जातंय. ताज्या विधानसभा निकालांमुळं भाजपला दहा हत्तींचं बळ प्राप्त झालंय, त्यामुळे महाविकास आघाडीसोर सरकार टिकवण्याचं आव्हान वाढलंय, एवढं नक्की.