पाटणा : बिहारमध्ये आलेल्या महापूराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे. अद्यापही पूरपरिस्थिती कायम असून, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार आणि नेपाळमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस हा बिहारमधील पूरस्थितीचे कारण आहे. त्यात नेपाळमधील धरणातून अतिरिक्त पाणीसाठी सोडल्यामुळे या पूरस्थिती अधिक वाढ झाली आहे. नेपाळमधील मैदनी भाग आणि सीमांचलमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे बिहारमधील पूर्णिया किशनगंज, कटिहार, अररिया, दरभंगासह एकूण १८ जिल्ह्यांमध्ये महापूर आला आहे. रस्ते, शेत, नद्या आदींमध्ये पाणीच पाणी असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महापूराचा सुमारे एक कोटी लोकांना फटका बसला असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार, बिहारमधील अररिया येथे 20, किशनगंजमध्ये 8, पूर्व चंपारण्य जिल्ह्यात 3, पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात 9, दरभंगा जिल्ह्यात 3, मधुबनी जिल्ह्यात 3 सीतामढी येथे 5, माधेपुरा येथे 4 आणि शिवहर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बिहारचे अपत्कालीन व्यवस्थापन विभाग पअतिरिक्त सचिव अनिरूद्ध कुमार यांनीही 56 लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.