मोठी बातमी | सरकारची Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी
केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे. सरकारने अनेक लोकप्रिय चीनी अॅपवर बंदी घातली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सरकारने हे पाऊल उचललं आहे. भारत-चीनमध्ये तणाव असताना मोदी सरकारने चीनवर हा एकप्रकारचा मोठा प्रहार केला आहे.
भारत-चीन वादानंतर भारतातून या अॅपवर बंदी घालण्याची मागणी वाढली होती. चिनी App वर बंदी घालण्यासाठी सोशल मीडियावर देखील जोरदार मागणी होत होती. अखेर आज सरकारने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे.
आयटी अॅक्टच्या 69 ए नुसार सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यावर बंदी घातली आहे.
सरकारने खालील मोबाईल App वर बंदी घातली आहे.