मुंबई : देशात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेची घोषणा होताच एअरटेल (Bharti Airtel) आणि जिओ (Reliance Jio) या दोन्ही कंपन्यांनी निवडक शहरांमध्ये 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर ग्राहकांची देखील स्मार्टफोनमध्ये (Smartphone) 5G सेवा सुरु करण्याची लगबग सुरु झाली आहे.या संधीचा फायदा घेत काही सायबर चोरट्यांनी फेक मेसेज पाठवत, अशा ग्राहकांना गंडा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर या मेसेजेस पासून सावध राहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : स्कूल बसमध्ये सापडला महाकाय अजगर, रेस्क्यू करण्याचा VIDEO आला समोर 


देशात 5G सेवा सुरु झाल्यानंतर काही सायबर चोरट्यांनी सेवा देण्याच्या नावाने ग्राहकांना गंडा घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पोलिस विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जर कोणी तुम्हाला 5G सेवा सुरु करण्यासाठी तुमची खाजगी माहिती विचारत असेल, तर सावध व्हा आणि तुमची माहिती शेअर करण्याची चूक करू नका.


फेक लिंक पाठवतात


हैदराबाद पोलिसांनी ट्विट करून नागरीकांना आवाहन केले आहे की, "सायबर घोटाळेबाज 5G च्या नावाने लिंक पाठवत आहेत. जर तुम्ही या लिंक्स उघडल्या तर तुमचा फोन हॅक होण्याचा धोका आहे. सिम 5G वर अपग्रेड करावे असे मेसेज आणि लिंक पाठवून ग्राहकांना गंडा घातला जातोय. 


मुंबई पोलिसांचे आवाहन


नवीन तंत्रज्ञानामुळे घोटाळ्याचे नवीन प्रकार झपाट्याने वाढले आहेत. सिम 5G मध्ये कनवर्ट करण्याच्या  नावाखाली फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तुमच्‍या शहरात 5G सेवा उपलब्‍ध असले तरीही, तुम्‍हाला वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणाशीही शेअर करण्‍याची गरज नाही, असे मुंबई  पोलिसांनी सांगितले आहे. 


'या' चुका टाळा


तुम्हाला जर 5G सेवेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमच्याकडे 5G फोन असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्हाला तुमचे सिम अपग्रेड करण्याची गरज नाही. तुमच्या फोनवर 5G अपग्रेडशी संबंधित कोणतीही लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका. दूरसंचार ऑपरेटरकडून येणार्‍या कॉलवर अवलंबून राहण्याची देखील चूक करू नका. तसेच कोणत्याही परिस्थितीत OTP किंवा बँक तपशील यांसारखी माहिती शेअर करू नका.