Viral Video : स्कूल बसमध्ये सापडला महाकाय अजगर, रेस्क्यू करण्याचा VIDEO आला समोर

बापरे! स्कूल बसमध्ये महाकाय अजगर, बसमधून बाहेर काढता काढता आले नाकी नऊ, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Updated: Oct 16, 2022, 08:52 PM IST
Viral Video : स्कूल बसमध्ये सापडला महाकाय अजगर, रेस्क्यू करण्याचा VIDEO आला समोर  title=

रायबरेली : रायबरेलीच्या एका स्कूल बसमध्ये (School bus) महाकाय अजगर (python video) सापडल्याची घटना घडलीय. सुदैवाने बस मुलांनी भरलेली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या बसमधून अजगराला बाहेर काढता काढता वनविभागाची (Forest officer) कसरत झाली होती. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर या अजगराला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.  

हे ही वाचा :  उर्फी शेर तर डॉली सव्वाशेर, बहिणीपेक्षाही निघाली खुपच बोल्ड, पाहा Photo 

रविवारी एका स्कूल बसमध्ये (School bus) 11 फूट लांब आणि 80 किलो वजनाचा महाकाय अजगर (python video) लपून बसला होता. हा अजगर बसच्या इंजिनमध्ये अडकला होता. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असल्याने मोठा अपघात टळला होता.मात्र य़ा अजगराला बसमधून बाहेर काढण्याची मोठी कसोटी होती. 

स्थानिक नागरीकांनी अजगराला (python video) बसच्या आत जाताना पाहिले, त्यानंतर एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच शहर परिमंडळ अधिकारी वंदना सिंह आणि नगर दंडाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी घटनास्थळ गाठून वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले.  

हे ही वाचा : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलत का? 

वनविभागाचे पथक बसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तासाभराच्या अथक परिश्रमानंतर अजगराला (python video) इंजिनमधून बाहेर काढले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराची सुटका केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी (Forest officer) दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या अजगराचे (python video) वजन सुमारे 80 किलो असून त्याची लांबी साडेअकरा फूट आहे. त्याला दलमाऊच्या जंगलात सुखरूप सोडण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.