घृणास्पद! 60 वर्षाच्या आजोबांकडून तब्बल दोन वर्षं श्वानावर बलात्कार, शेजाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केलं धक्कादायक कृत्य
Crime News: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका 60 वर्षाय व्यक्तीने आपल्याच पाळीव श्वानावर (Pet Dog) तब्बल दोन वर्षं बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी हे कृत्य करत असताना शेजाऱ्यांनी मोबाइलमध्ये हा सगळा प्रकार कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला.
Crime News: पश्चिम बंगालमधील (West Bengal) एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने आपल्याच पाळीव श्वानावर (Pet Dog) तब्बल दोन वर्षं बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साऊथ 24 परगना जिल्ह्यातील सोनारपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपीच्या परिसरातील काही लोकांनी हे कृत्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअऱ केल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
रतीकांत सरदार असं या आरोपीचं नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी परिसरातील काही लोकांना त्याला श्वानावर बलात्कार करत असताना कॅमेऱ्यात कैद केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रतीकांत हा नको त्या अवस्थेत होता. तसंच यावेळी श्वान ओरडत होता.
एका स्थानिकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, "रतीकांत हा गेल्या दोन वर्षांपासून आपल्या श्वानावर लैगिक अत्याचार करत होता. आम्ही वारंवार त्याला श्वानाला सोडून दे आणि हे असं कृत्य करु नकोस असं सांगत होतो. पण तो आमचं काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता".
रतीकांत वारंवार हे कृत्य करत असल्याने नागरिकांनी मोबाइलवर त्याचं हे कृत्य कैद केलं आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. एका प्राणीमित्राने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने सोनारपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.
"आम्ही बुधवारी घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ पाहिला. यानंतर आम्ही त्याच्या आधारे कलम 377 आणि 11 अंतर्गत तक्रार दाखल केली. यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला," अशी माहिती कोलकाता अॅनिमल वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक संदीपन मुखर्जी यांनी दिली आहे.
जवळपास वर्षभरापूर्वी नागरिकांनी हा व्हिडीओ शूट केला होता. पण त्यांना प्राण्यासंबंधीच्या कायद्यांची कोणतीही माहिती नसल्याने ते कोणतीही कारवाई करु शकले नाहीत. स्थानिकांनी बोलल्यानंतर आम्हाला ते वारंवार आरोपीला कृत्य करण्यापासून रोखत होते, पण तो दुर्लक्ष करत होता अशी माहिती मिळाल्याचं संदीपन यांनी सांगितलं आहे.
याआधी आरोपी रस्त्यांवरील मादी श्वानांना पकडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. पण नेहमी तो त्याच्यातून आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी ठरायचा. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे.
आरोपी रतीकांत याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, श्वानाला प्राण्यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आलं असता लैंगिक अत्याचार झाल्याला दुजोरा मिळाला आहे. श्वानाला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत.