उत्तर प्रदेश : मऊच्या मोहम्मदाबाद कोतवाली परिसरातील वलीदपूर गावात सिलिंडर स्फोटात दोन मजली घर कोसळले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. तर बाराहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती  व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव कार्य सुरु केले आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, पीडितांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या अपघातालील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अपघातात जखमी झालेल्या १५ जणांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी घरात सुमारे २४ लोक लोक होते. ही घटना सकाळी साडेसहा वाजता घडली. सिलिंडर फुटल्यानंतर घरात आग मोठी आग पसरली. यात घरालाही आग लागली आणि दोन मजली घर कोसळल्याची माहिती स्थिनिकांनी दिली.



अपघातग्रस्त घराचा ढिगारा बाजुला करण्यासाठी आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी घटनास्थळावर रुग्णवाहिकाही उपलब्ध दाखल झाली आहे. मात्र, या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.