धुक्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस तलावात कोसळली...
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील बेलडांग भागात शनिवारी एक दुघर्टना झाली.
मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील बेलडांग भागात शनिवारी एक दुघर्टना झाली. रस्त्यावर धुके पसरल्याने प्रवाशांनी भरलेली एक बस तलावात कोसळली. यात दुघर्टनेत ७ लोकांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले. गंभीररीत्या जखमी झालेल्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही दुघर्टना झाल्यावर आजूबाजूच्या लोकांनी पोलीसांना याची माहिती दिली.
स्थानिक लोक मदतीसाठी सरसावले
स्थानिक लोकांनी तलावात बस पडल्याची माहिती पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वी स्थानिक लोकांनी मदतकार्य सुरू केले होते. त्यांनी लोकांना तलावातून काढण्यास सुरूवात केली होती. त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसह मिळून बसची खिडकी, दरवाजे तोडून लोकांना बाहेर काढले. मात्र मृत्यांच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अशी काढली बस बाहेर
मृतदेह आणि जखमींना बाहेर काढल्यानंतर पोलीसांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढली. रस्त्यावर धुके पसल्याने ड्रायव्हरला रस्ता नीट दिसला नाही आणि अंदाज चुकल्याने बस तलावात कोसळली.