नवी दिल्ली : काळ्या पैशांविरोधात मोदी सरकारला कोणालाही असंच सोडणार नाही असंच दिसतंय. आता अशी बातमी येत आहे की लोकसभेचे 7 खासदार आणि राज्यांच्या 98 आमदारांची संपत्ती अधिक प्रमाणात वाढल्याने त्याची चौकशी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) ने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, काही खासदार आणि आमदारांच्या मालमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सीबीडीटी या लोकसभा खासदार आणि आमदारांची नावे सीलबंद लिफाफ्यात सुप्रीम कोर्टापुढे सादर करणार आहे. मालमत्ता चौकशीमध्ये असं समोर आलं की, ७ खासदारांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर अनेक राज्यांच्या आमदारांची देखील संपत्ती वाढली आहे.


लखनौच्या एका एनजीओने आरोप केले होते की, लोकसभेचे २६ खासदार, राज्यसभेचे ११ खासदार तर २५७ आमदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. यानंतर आयकर विभागाने चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाला अशी देखील माहिती देण्यात आली आहे की, आणखी काही खासदार आणि आमदारांच्या संपत्तीची चौकशी सुरु आहे.