7 वर्षाच्या मुलाची झोमॅटो डिलिव्हरी बॉय बनण्याची कहाणी! व्हिडीओ व्हायरल.. अशी वेळ कोणावर नको यायला..पहा व्हिडीओ
हा मुलगा दिवसा शाळेत जातो आणि रात्री झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो .
7 year boy is doing his father job as a delivery boy for zomato: सध्या सोशल मीडियावर एका ७ वर्षाच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात हा लहान मुलगा डिलिव्हरी बॉय बनून घरोघरी जाऊन जेवणाच्या ऑर्डर्स पोहचवण्याचं काम करतो. 7 वर्षांचा शाळकरी मुलगा अपघातात त्याचे वडील जखमी झाल्यानंतर झोमॅटो डिलिव्हरी एजंट बनला. रात्री 11 वाजेपर्यंत तो सायकलवरून ग्राहकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचे काम करतो.
राहुल मित्तल या युजरने शेअर केलेल्या ट्विटर थ्रेडमध्ये या मुलाची कहाणी समोर आली आहे. हा मुलगा दिवसा शाळेत जातो आणि रात्री झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो .
,खरतर 'हा 7 वर्षाचा मुलगा त्याच्या वडिलांच काम करतोय कारण त्याच्या वडिलांचा अपघात झाला होता आणि त्यामुळे ते काम करू शकत न्हवते त्यामुळे वडिलांची जबाबदारी या चिमुरड्याने घेतली आणि कमला सुरवात केली हा मुलगा सकाळी शाळेत जातो आणि 6 वाजल्यानंतर तो झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. .
मित्तलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो मुलगा हे सांगतोय कि तो संध्याकाळी 6 ते 11 या वेळेत सायकलवरून घरोघरी जाऊन जेवण देतो. आतापर्यंत या ट्विटर व्हिडिओला 41,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेक युझर्सनी तरुण मुलाच्या धैर्याचे कौतुक केल आहे.
झोमॅटोनेही मुलाच्या व्हिडिओला प्रतिसाद दिलाय आणि वापरकर्त्याला त्याच्या वडिलांचे तपशील त्याच्यासोबत शेअर करण्याची विनंती देखील केलीये .