माता न तु वैरिणी! चिमुरडीच्या अंगावर चावल्याचे डाग, नेमकं प्रकरण काय?
चिमुरडीचे आईवरील आरोप पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकलीय.
नवी दिल्ली : नवी दिल्लीत आईने आपल्याच मुलीवर क्रुर छळ केल्याची घटना घडलीय. गेले कित्येक महिने ही चिमुरडी हा छळ निमुटपणे सहन करत होती. मात्र या संदर्भातला व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेची उकल झाली आहे. या घटनेतील चिमुरडीचे आईवरील आरोप पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकलीय. या हद्यद्रावक घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.
आई कधी क्रूर असू शकते, हे बोलणचं अथवा लिहणचं फार अवघड जात आहे. मात्र काही असलं तरी या घटनेतील आई ही क्रुर आहे. या आईने 7 वर्षाच्या निष्पाप मुलीला असह्य वेदना दिल्याचे आरोप आहेत.आई मारते,शरीराचा चावाही घेते, असे आरोप मुलीने केले आहेत. या संदर्भातला आरोपांचा व्हिडिओ शाळेतील एका शिक्षकाने बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत तपास सुरू केला आहे.
व्हिडिओत काय?
या तरुणीचा व्हिडिओ 28 जूनपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एके दिवशी मुलगी घाबरत शाळेत पोहोचली असता शिक्षकांनी तीची विचारपूस केली. घाबरलेल्या या मुलीला विश्वासात घेतल्यानंतर शिक्षकांसमोर या घटनेची उकळ केली. शिक्षकांनी खूप विचारल्यावर मुलगी सांगते की, माझी आई मला मारते आणि होमवर्क करत नाही म्हणून चावते. मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणाही दिसून आल्या. ती स्वतःला वाचवण्याची विनवणीही करत होती.
तीन वर्षांपूर्वी कुटुंबापासून विभक्त झालेल्या मुलीला नोएडा येथे राहणाऱ्या महिलेने दत्तक घेतले होते. ही मुलगी सरफाबाद गावातील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नोएडा पोलिस स्टेशन सेक्टर 113 मध्ये मुलीच्या आईची चौकशी सुरू केली आहे.
नोएडा एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, या मुलीला एप्रिलमध्ये मथुराच्या बालगृहातील महिलेने दत्तक घेतले होते. ही महिला गेल्या 4 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहते. दरम्यान आपल्या एकटेपणावर मात करण्यासाठी तिने एका निरागस मुलाला दत्तक घेतले. ही तरुणी हरियाणाची असून 3 वर्षांपूर्वी तिच्या कुटुंबीयांपासून विभक्त झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी ही महिला तरुणीसोबत नीट वागत होती, मात्र आता तिने तिचा छळ सुरू केला आहे. कधी-कधी मुलीला शिकण्यासाठी तिला मारत असते, असे महिलेचे म्हणणे आहे.