मुंबई : ज्या वयात मुलं लिहण्या- वाचण्यात दंग असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मजामस्ती करत असतत तेव्हा मारवान वोराजी या सात वर्षीय मुलगा चक्क विमान उडवत आहे. 


मारवानचे हे टॅलेंट थक्क करणारे आहे. त्याच्या  कुटुंबियांप्रमाणेच सरकारही  हे टॅलंट पाहून आवाक झाले आहे.  मारवान अगदी प्रोफेशनली विमान उडवतो आणि तितक्याच सहज लॅन्डही करतो. 


मारवानचे वडीलही पायलट आहेत. विमान उडवण्याचे प्राथमिक धडे त्याला वडिलांकडूनच मिळाले आहेत. त्याच्या वाढदिवसादिवशी फ्लाईंग लेसर बुक केली  होती. त्यानंतर कॉकपीटबद्दल माहिती दिली. केवळ इतक्या तोंडओळखीवरच मारवानने यशस्वीरित्या फ्लाईट उडवले. हा पहिला अनुभव खूप मस्त असल्याची माहितीदेखील त्याने आईला दिली. 


मरवानच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, मारवानला विमानाशी निगडीत खेळ अत्यंत आवडीचे आहेत.  अनेकदा त्याच्या डोक्यात विमानाशी निगडीत गोष्टीच सुरू असतात. मोठा होऊन मारवान पायलट होणार हे आता त्यांच्या कुटुंबियांनी निश्चितच केले आहे.  मारवानचे हे स्वप्न वास्तवात येण्यासाठी अजूनही ७ वर्षांचा कालावधी जाणार आहे.