पती पत्नीच्या नात्यामध्ये (wife husband) रुसवे फुगवे हे सुरुच असतात. शेवटी दोघांपैकी एकजण हार माणून माफी मागतो आणि हा रुसवा संपतो. पण काही वेळा दोघेही हट्टाला पेटून उठवले तर त्यांचा रुसवा दूर करणं कठिणच होऊन बसतं. मग अशावेळी वयाचेही बंधन येत नाही. असाच काही प्रकार एका सत्तरीतल्या जोडप्यासोबत घडलाय. नाराज पत्नीचे मन वळवण्यासाठी एका 70 वर्षीय आजोबांनी बेफान होऊन डान्स केलाय. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाक्षिणात्य स्टार विजयच्या (actor vijay) अरबी कुथू (arabic kuthu) या तमिळ (Tamil) गाण्यावर आपल्या पत्नीचे मन वळवण्यासाठी पतीने डान्स केलाय. या आजोबांच्या डान्सवर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.


इंस्टाग्राम (Instagram) युजर श्रुती वासुदेवनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लुंगी घातलेले तिचे वडील खुर्चीवर बसलेल्या आपल्या पत्नीकडे चालत असल्याचे दाखवले आहे. ते मागे जाऊन अरबी कुथू गाण्यावर तालबद्ध नाचत आहेत. हा नाच त्यांची पत्नी पाहते. सुरुवातीला त्या हसतात आणि त्यांना प्रेमाने मारते. मात्र आजोबा थांबत नाहीत गाण्याच्या स्टेप्स पूर्ण करतात. त्यांचा डान्स पाहून  एक स्त्री मोठ्याने हसताना ऐकू येते.



श्रुती वासुदेवन यांनी त्यांच्या पालकांना क्युटीज असे म्हटले आहे. तसेच इंस्टाग्रामवर  "विनंतीवरुन अपलोड केलाय. जर तुम्ही तुमच्या आतील मुलाला जिवंत ठेवले तर तुमच्या सभोवताली नेहमीच आनंद असतो. हे क्यूटीज माझे अप्पा आणि अम्मा आहेत. @anirudhofficial गाण्यासाठी धन्यवाद," असे कॅप्शन दिले आहे.


एका आठवड्यापूर्वी शेअर केलेल्या या इंस्टाग्रामवर व्हिडीओ 14.9 दशलक्षाहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर 9 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.