गंगा नदीत 70 वर्षाच्या आजींनी घेतली उडी, व्हिडिओ पाहून लोकं होतायंत हैराण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : हरिद्वारच्या पुलावरून गंगेत उडी मारलेली आजी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या वयात खळखळणाऱ्या गंगा नदीत निर्भयपणे उडी मारून सहज तरंगणे खरोखरच कौतुकास्पद होते.
 
न घाबरता गंगेत उडी घेणाऱ्या या वृद्ध महिलेचे वय ७० पेक्षा जास्त असेल. या वयात क्वचितच चालता येते आणि असे स्टंट करण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. मात्र या वृद्ध महिलेने हा विचार चुकीचा सिद्ध केला आहे.


हरियाणाच्या जींदमध्ये राहणारी एक वृद्ध महिला हर की पौरी येथे आंघोळ करत होती. इतक्यात काही तरुण उंच पुलावरुन गंगेत उड्या मारत होते, ते पाहून त्या वृद्ध महिलेलाही आपले जुने दिवस आठवले आणि त्या खूश झाल्या. काही वेळातच त्याही पुलावर पोहोचल्या आणि थेट गंगेत उडी मारली.


घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी हा अद्भुत पराक्रम आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र, आजीचा स्टंट व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सने सुटकेचा नि:श्वास सोडला. पण आजी जलद पोहत किना-यावर पोहचल्या.