Viral Video : लय असत्याल मनमौजी, लाखात एक... हाच फौजी; कोण आहेत मेजर गौरव चौधरी?
एखाद्या कलाकारालाही लाजवेल इतकी प्रसिद्धी
मुंबई : सोशल मीडियावर इन्स्टा सुरु करा, एफबी किंवा मग युट्यूब. हल्ली एकाच ठिकाणी सर्वांचा जीव गुंततो. ते ठिकाण म्हणजे Reels. गाणी, सिनेमातील डायलॉग्स आणि काही धमाल किस्से यांच्यावर आधारित काही सेकंदांचे व्हिडीओ या रिल्समध्ये पोस्ट करण्यात येतात. याच रिल्समुळं आजच्या घडीला अनेकजणांना नवी ओळख मिळाली आहे. एखाद्या कलाकारालाही लाजवेल इतकी प्रसिद्धी या मंडळींना मिळालेली आहे. (75 independance day major gaurav chaudhary has become national crush watch video)
रिल्स आणि इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळं चर्चेत आलेला असाच एक चेहरा म्हणजे मेजर गौरव चौधरी यांचा. भारताचे माजी राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांच्याभोवतीच मेजरना पाहिलं गेलं. त्यांच्या रुपानं, रुबाबानं आणि लाघवी हास्यानं सर्वांनाच वेड लावलं. फक्त तरुणीच नव्हे, तर संपूर्ण देश त्यांच्यावर भाळला.
कोण आहेत मेजर चौधरी?
रामनाथ कोविंद देशाच्या राष्ट्रपतीपदी असताना मेजर चौधरी राष्ट्रपति स्टाफ मध्ये एडीसी पदावर (एड-डी-कँप) सेवेत असल्याचं पाहायला मिळालं. नॅशनल डिफेंस अकॅडमी आणि इंडिटन मिलिटरी अकॅडमी येथून त्यांनी शिक्षण घेतलं. पॅराशूट रेजिमेंटच्या 10 व्या बटालियनमध्येही त्यांनी सेवा दिली आहे.
गौरव चौधरी पॅरा स्पेशल फोर्सशीही संलग्न होते. हे भारतीय लष्करातील सर्वात उच्चवर्गीय कमांडो युनिट आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय लष्कराकडून त्यांच्या कमांडोंची माहिती जाहीरपणे सांगितली जात नाही, ज्यामुळं मेजर चौधरी यांच्याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही.
सोशल मीडियावर मात्र या देखण्या आणि रुबाबदार 'फौजी'चे फॅन पेज आहेत, जिथं त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्यात येतात. सूत्रांच्या माहितीनुसार मेजर चौधरी काही काळापूर्वी सोशल मीडियावर सक्रिय होते, पण कालांतरानं त्यांचं हे अकाऊंट डिलीट करण्यात आलं.