PM Modi Speech : भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच देशातील प्रत्येक नागरिकाचा ऊर अभिमानानं भरून आला आहे. बर्फाच्छादित डोंगररांगांपासून ते रखरखीत वाळवंटापर्यंत सर्वत्र देशाचा तिरंगा ध्वज अतिशय दिमाखात फडकत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारताला उल्लेख लोकशाहीची जननी असाही केला. (75 Independence Day PM modi speech important points )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 
- महात्मा गांधींपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या प्रत्येकाचे मोदींनी देशवासियांच्या वतीनं आभार मानले. राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई अशा वीरांगनांच्या योगदानापुढेही पंतप्रधान नतमस्तक झाले. 


- भारत म्हणजे लोकशाहीची जननी. आतापर्यंतच्या 75 वर्षांच्या काळात भारतानं बऱ्याच वादळांचा सामना करत आपली पात्रता सिद्ध केली म्हणक देशातील प्रत्येक नागरिकानं दिलेल्या योगदानाचाही उल्लेख त्यांन केला. 


- भारतात नागरिकांच्या एकात्मतेतून एक ध्येय्यवादी समाज घडत आहे. देशातील नागरिकंना सकारात्मक बदल हवे आहेत, ज्यासाठी नागरिकही यात योगदान देत आहेत, असं पंतप्रधान अभिमानानं म्हणाले. 


- येत्या वर्षांत आपण, 'पंचप्रण' या घटकावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. यामध्ये प्रगत भारत, आपल्याला मिळालेला वारसा जपणं आणि त्याचा अभिमान बाळगणं, एकीचं बळ जाणत त्यावर विश्वास ठेवणं आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी निभावणं यांचा समावेश असल्याचं ते म्हणाले. 


- डिजिटल भारताकडे लक्ष वेधत येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. यावेळी स्टार्टअप आणि लहान खेड्यांतून येणाऱ्या नवउद्यमींवर शाबासकीची थाप दिली. 


- भारत, अर्थात आपला देश हा कायमच प्राधान्यस्थानी असावा हाच एकजूट भारताचा राजमार्ग असेल असं पंतप्रधान आग्रही स्वरात म्हणाले. 



- आपण कायमच लाल बहादूर शास्त्री यांचं 'जय जवान, जय किसान' हे घोषवाक्य लक्षात ठेवलं. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं 'जय विज्ञान' हे वाक्य त्यात जोडलं गेलं. आता त्यात आणखी एक भर पडेल ती म्हणजे 'जय अनुसंधान', असं पंतप्रधान म्हणाले. 


- महिला, नारीशक्तीचा कधीच अनादर करणार नाही, अशी प्रतिज्ञाच घ्या; असं सांगताना पंतप्रधानांनी देशातील महिलांचाही गौरव केला. खेळापासून युद्धभूमीपर्यंत महिलांच्या योगदानाचं यावेळी त्यांनी कौतुक केलं.