केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका; 18 महिन्यांचा DA Arrear देण्यास मनाई
7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाणार नाही. ही त्या दीड वर्षाची थकबाकी आहे, जेव्हा कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सरकारने महागाई भत्ता गोठवला होता.
मुंबई : 7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचार्यांना 2020 पासून 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचे पैसे मिळणार नाहीत. कोविड-19 संक्रमणाच्या वेळी थकलेला महागाई भत्ता दिला जाणार नाही. 18 महिन्यांच्या डीए थकबाकीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेली DA ची थकबाकी दिली जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
वित्त मंत्रालयाने डीए थकबाकीचा प्रस्ताव फेटाळला
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाणार नाही. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे सरकारने महागाई भत्ता गोठवला. ही थकबाकी साधारण दीड वर्षाची आहे. आता थकबाकी देण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या थकबाकीचे 3 हप्ते जारी करण्याची पेन्शनधारकांची विनंती वित्त मंत्रालयाने फेटाळली आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी DR (पेन्शनधारकांसाठी) आणि महागाई भत्ता (DA-कर्मचार्यांसाठी) ची एकूण थकबाकी सुमारे 34,000 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.