मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबरी दिलीय. एक दिवसापूर्वीच आर्थिक प्रकरणाच्या केंद्रीय समितीनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात दोन टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यामुळे आता डीए 7 टक्क्यांहून 9 टक्के झालाय. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना दोन टक्के अधिक डीए मिळेल. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रति महिना 360 ते 5000 रुपयांपर्यंत वाढ झालीय. 


यानंतर पुन्हा सहा महिन्यांनी महागाई भत्त्याची पडताळणी केली जाईल. याची घोषणा मार्च 2019 मध्ये केली जाण्याची शक्यता आहे.  


श्रेणी  किमान बेसिक पे  वाढ (2% डीए वाढीसोबत)  श्रेणी  किमान बेसिक पे (रुपयांत) वाढ (2% डीए वाढीसोबत)
 श्रेणी 1  18000  360 श्रेणी 11  67700  1354
 श्रेणी 2  19900  398 श्रेणी 12  78800  1576 
 श्रेणी 3  21700  434 श्रेणी 13   118500  2370 
 श्रेणी 4  25500  510 श्रेणी 13ए  131100  2622 
 श्रेणी 5  29200  584 श्रेणी 14  144200  2884 
 श्रेणी 6  35400  708 श्रेणी 15  182200 3644 
 श्रेणी 7  44900  898 श्रेणी 16  205400  4108 
 श्रेणी 8  47600  952 श्रेणी 17  225000  4500 
 श्रेणी 9  53100  1062 श्रेणी 18  250000  5000 
 श्रेणी 10  56100  1122