7th Pay Commission : कर्मचाऱ्यांची मज्जाच मजा, DA नंतर `या` 4 भत्त्यांमध्ये भरघोस वाढ होणार
सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ केल्यानंतर मोठं गिफ्ट देण्याचा विचार करत आहे.
7th Pay Commission Latest News : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ केल्यानंतर सरकार कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याचा विचार करत आहे. डीएमध्ये वाढ केल्यानंतर सरकार एकाच वेळी आणखी 4 भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. (7th pay commission central government may incresed 4 allowances after da hike)
4 भत्त्यांमध्ये वाढ होणार
सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना 34 टक्क्यांऐवजी 38 टक्के डीए मिळेल. एकाच वेळी 4 भत्ते वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.
या 4 भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता (Travel Allowance), शहर भत्ताही (City Allowance) वाढवण्यात येणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीही (Gratuity) वाढणार आहे.
3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ वेतन आणि डीएच्या आधारे केली जाते. त्यामुळे या परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटीही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते, असं म्हटलं जात आहे.