मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची (7th Pay Commission DA Hike) बातमी आहे. याा कर्मचाऱ्यांसाठी ऑगस्ट फार लकी ठरलाय. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जबरदस्त वाढ झाली आहे. मध्य प्रदेश, गुजरातनंतर छत्तीसगड राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना गूड न्यूज दिली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात 6 टक्क्यांनी वाढ करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. (7th pay commission chhatisgarh state government empolyee dearness allowance hike by 6 percent)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा एकूण 28 टक्के इतका झालाय. या निर्णयाचा 3.8 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचारी 7 व्या वेतन आयोगानुसार 22 आणि 6 व्या वेतन आयोगानुसार 174 टक्के महागाई भत्त्याचा लाभ घेत होते.


मात्र आता 7 व्या वेतन आयोगानुसार 6 आणि  6 व्या वेतन आयोगानुसार 15 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 2 हजार 160  कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.