7th Pay Commission: `या` दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार
DA Hike : दिवसांची सुरुवात आनंदाची बातमी करुयात. मिळालेल्या सूत्रांनुसार DA कडून जानेवारी 2023 पासून 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे तुमच्या हातात नेमक्या किती पगार येणार आहे हे जाणून घ्या...
7th Pay Commission DA Hike Calculation : दिवसाची सुरुवात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून डीए वाढीचा निर्णय होणार आहे. 1 मार्चला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. यावेळी महागाई भत्ता आणि महागाई सवलत 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यासह ते 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात वाढीव डीए आणि थकबाकी दोन्हीचा लाभ मिळणार आहे.
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढणार?
याचा अर्थ मार्च महिना हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी असणार आहे. या महिन्यात त्यांना पगारासह जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्हीसाठी डीए मिळेल. AICPI च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालंय की यावेळी महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, जानेवारी 2023 पासून डीए 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. याचा फायदा 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. (7th Pay Commission DA Hike Calculation Central employees will get DA of 10500 rupees in March and Knowing how much your salary will increase in marathi)
पगार किती वाढणार?
7 व्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याची गणना मूळ वेतनाच्या आधारे केली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा मूळ पगार 25,000 रुपये असेल, तर त्याला 25,000 रुपयांवर 42% DA मिळेल. म्हणजेच 25,000 चा 42 टक्के DA 10,500 रुपये झाला. या आधारे इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीएही वाढणार आहे. तुम्ही तुमच्या मूळ पगाराची माहिती गोळा करून त्याची गणना देखील करू शकता.
असे होणार कॅलकुलेशन
Level 1 Basic pay : रु 18000
42% DA म्हणजे रु. 7560 प्रति महिना
Level 1 Basic pay : रु 25000
42% डीए म्हणजेच रु 10500 प्रति महिना
पगारात किती फरक असणार?
7 व्या वेतन आयोगाअंतर्गत, जर तुमचा मूळ वेतन रु. 18,000 असेल, तर तुम्हाला 38 टक्के दराने 6,840 रुपये महागाई भत्ता मिळेल. पण महागाई भत्ता 42 टक्के असेल तर तो 7560 रुपये होईल. त्याचप्रमाणे, जर तुमचा मूळ पगार 25,000 रुपये असेल, तर सध्या तुम्हाला 9,500 रुपये महागाई भत्ता मिळेल. पण डीए 42 टक्के असल्याने तो 10,500 रुपये होईल.
(टीप: येथे वाढीव DA ची गणना उदाहरणार्थ केली गेली आहे. डीए वाढल्याने इतर भत्त्यांवरही परिणाम होतो. अशा स्थितीत अंतिम गणनेत तफावत असू शकते.)