7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्ससाठी महत्वाची बातमी
कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. देशातील खर्च वाढलाय आणि कमाई कमी झालीय.
नवी दिल्ली : जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा पेंशनर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण केंद्र सरकारने आपले कर्मचारी आणि पेंशनरसच्या महागाई भत्त्यात साल २०२० मध्ये कोणतीही वाढ होणार नाही. पण पुढच्या वर्षी जुलैमध्ये Dearness Allowance मध्ये वाढ करण्यावर केंद्र सरकार विचार करु शकते. ५० लाख केंद्र सरकार कर्मचारी आणि ६१ लाख पेंशनधारकांवर याचा परिणाम होणार आहे.
कोरोनाकाळात आलेले आर्थिक संकट पाहता जुलै २०२१ पर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness allowance) वाढ करणं टाळलंय. १ जानेवारी २०२१ पासून केंद्र सरकारने पेंशनर्सना महागाई भत्त्यात दिला जाणारा वाढीव हफ्ता दिला जाणार नाहीय.
कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. देशातील खर्च वाढलाय आणि देशातील कमाई कमी झालीय. त्यामुळे लोकांकडून खर्च देखील कमी केला जातोय.
केंद्रीय मंत्रीमंडळाने मार्चमध्ये डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढीस मंजुरी दिली होती. सर्वसाधारणपणे वाढत्या किंमतीत भरपाईसाठी वर्षातून दोनवेळा डिए संशोधन केले जाते. सरकारच्या खर्चात कपात करण्याचा हा एक मार्ग आहे. याआधी मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संसदीय सदस्यांच्या पगारातून ३० टक्के कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. कोरोना संकटात अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी MPLADs योजना देखील दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आलीय.