नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Empolyees) पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकार डीएमध्ये (DA) वाढ केल्यानंतर आता आणखी एक भत्ता वाढवण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीए वाढीसोबत एचआरए वाढीचीही घोषणा केली जाऊ शकते. वास्तविक, डीए वाढीसह, एचआरएमध्ये सुधारणा देखील अपेक्षित आहे. (7th pay commission government may be incresed central government empolyee hra after dearness allowance)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या (Pensioners) डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. या महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. यासोबतच एचआरएमध्ये वाढ करण्याची घोषणाही लवकरच केली जाऊ शकते. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये एचआरएमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डीए देखील 28 टक्के करण्यात आला. आता डीए 38 टक्के झाला आहे.  तर एचआरएमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.


एचआरए कसं ठरतं?


ज्या शहराची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे ते शहर 'X' श्रेणीत येतं. ज्या शहरात लोकसंख्या 5 लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शहराची गणना ‘Y’ श्रेणीत केली जाते. तर 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरं शहरे 'Z' श्रेणीत येतात. तिन्ही श्रेणींसाठी किमान एचआरए 5 हजार 400, 3 हजार 600 आणि 1 हजार 800 रुपये असेल.


किती एचआरए वाढणार? 


त्यानुसार कर्मचार्‍यांचा एचआरए ते काम करत असलेल्या शहराच्या श्रेणीनुसार ठरवला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, X श्रेणीतील शहरांमध्ये राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA DA प्रमाणेच 4 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या या शहरांतील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 27 टक्के एचआरए मिळतो. 


तसेच वाय श्रेणीतील शहरांसाठी एचआरएमध्ये 2 टक्के वाढ शक्य आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना 18 ते 20 टक्के एचआरए मिळतो. झेड श्रेणीतील शहरांसाठी 1 टक्के एचआरए वाढवला जाऊ शकतो. या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सध्या 9-10 टक्के दराने HRA दिला जातो.