मुंबई : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 27 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. महागाई भत्त्यासह इतर भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे. या भत्त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा भत्ता म्हणजे घरभाडे भत्ता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महागाई भत्ता 25% ओलांडल्यानंतर HRA देखील सुधारित केला जातो. सरकारने जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता वाढवून 28 टक्के केला होता. यापूर्वी 17 टक्के महागाई भत्ता फ्रिज केला होता.


डीएमध्ये वाढ केल्यानंतर एचआरए रिव्हिजनही करण्यात आले आहे. HRA चे सध्याचे दर 27%, 18% आणि 9% आहेत. मात्र, ऑक्टोबरमध्ये सरकारने महागाई भत्त्यात 31 टक्के वाढ केली.


आता प्रश्न असा आहे की डीए वाढल्यानंतर एचआरएची पुढील रिविजन कधी होणार?


कर्मचाऱ्यांना एचआरएचा लाभ


Department of Personal and training- DoPT नुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता (HRA) मध्ये सुधारणा महागाई भत्त्याच्या आधारावर करण्यात आली आहे.


सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव एचआरएचा लाभ मिळू लागला आहे. शहराच्या श्रेणीनुसार 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के दराने एचआरए दिला जात आहे.


डीएसह ही वाढ 1 जुलै 2021 पासून लागू आहे. परंतु, सरकारने 2015 मध्ये जारी केलेल्या मेमोरेडममध्ये म्हटले होते की वाढत्या DA सह HRA वेळोवेळी सुधारित केले जाईल. 


HRA 3% वाढेल


घरभाडे भत्त्यात पुढील सुधारणा देखील 3% असेल. एचआरए सध्याच्या कमाल 27 टक्के दरावरून 30 टक्के करण्यात येईल. परंतु, हे तेव्हाच होईल जेव्हा महागाई भत्त्याची सुधारणा 50% च्या पुढे जाईल.