7th Pay Commission: या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; DAचे नोटिफिकेशन जारी, पाहा कधी मिळणार डीएचे पैसे?
DA hike Notification: सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये 3% महागाई भत्त्यात वाढ केली होती.
7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचार्यांच्या डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्याची घोषणा गेल्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महागाई भत्ता वाढवण्याची अधिसूचना वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून (DOE) जारी करण्यात आली आहे. (7th Pay Commission Dearness Allowance hike notification for central employees)
मार्चमध्ये, महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यातआली होती. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, महागाई भत्त्याचे सुधारित दर 1 जुलै 2022 पासून लागू केले जातील. लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे येतील. सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये 3 टक्के महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला होता.
नोटिफिकेशनच्या मुख्य गोष्टींबद्दल जाणून घ्या-
1. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्क्यांऐवजी 38 टक्के महागाई भत्ता दिला जाईल. हा भत्ता मूळ वेतनाच्या आधारावर असेल. सुधारित दर 1 जुलै 2022 पासून लागू होईल.
2. सातव्या वेतन आयोगांतर्गत विविध स्तरांच्या आधारे 'मूलभूत वेतन' निश्चित करण्यात आले आहे. या सुधारित वेतन रचनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मूळ वेतनात विशेष भत्ता नाही.
3. मूळ वेतन हा कोणत्याही केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगाराचा अत्यावश्यक भाग असतो. हे FR9(21) अंतर्गत पगार मानले जाते.
4. खर्च विभाग (DoT) च्या अधिसूचनेमध्ये, असे म्हटले आहे की महागाई भत्त्याच्या पेमेंटमध्ये 50 पैसे किंवा त्याहून अधिक रक्कम पूर्ण रुपया मानली जाईल. त्यापेक्षा कमी रक्कम दुर्लक्षित केली जाऊ शकते.
5. अधिसूचनेनुसार, सुधारित DA चा लाभ संरक्षण सेवांच्या नागरी कर्मचार्यांना उपलब्ध असेल. हा खर्च त्या विशिष्ट संरक्षण सेवा अंदाजाच्या शीर्षकाखाली येईल.
वाढीव डीए थकबाकीची अधिसूचना
वाढीव डीए थकबाकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर आता सरकारच्यावतीने डीएचा फरक मिळण्यास सुरुवात होईल. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात लवकरच पैसे येण्यास सुरुवात होईल.