7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळणार, पुन्हा एकदा DAत वाढ
7th Pay Commission Latest Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीच्या महागाई भत्त्यानंतर आणखी एक मोठी बातमी येत आहे.
मुंबई : 7th Pay Commission Latest Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीच्या महागाई भत्त्यानंतर आणखी एक मोठी बातमी येत आहे. सरकारने मार्चमध्ये जानेवारीसाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर एप्रिलमध्ये थकबाकीसह देण्याची घोषणा करण्यात आली. आता जुलैमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढू शकतो.
महागाई भत्ता 4 टक्के दराने वाढू शकतो
वाढत्या महागाईपासून दिलासा मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाऊ शकते. मार्चमध्ये आलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकवरुन (AICPI) याची पुष्टी झाली आहे की जुलै-ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4 टक्के दराने वाढू शकतो.
डीए 38 टक्क्यांपेक्षा जास्त असणार !
जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये AICPI मध्ये झालेल्या घसरणीमुळे जुलै-ऑगस्टसाठी DA (महागाई भत्ता) वाढण्याची शक्यता कमी होती. मात्र आता मार्च महिना आल्याने आशा वाढल्या आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांवर राहिला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांपर्यंत वाढेल.
डीए वाढीचा मार्ग मोकळा
RBI कडून रेपो दरात झालेली वाढ आणि महागाईचा दर पाहता, DA ची वाढ 4 टक्क्यांहून अधिक असू शकते, असा अंदाज आहे. म्हणजेच, महागाई भत्ता (डीए वाढ) 38 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. मात्र, डीए वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी शंका याआधी व्यक्त केली जात होती.
जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 साठी AICP निर्देशांकात घसरण झाली. एआयसीपी निर्देशांक जानेवारीमध्ये 125.1 आणि फेब्रुवारीमध्ये 125 होता. मार्चमध्ये ते 1 अंकाने वाढून 126 वर पोहोचले. आता एप्रिल-मे आणि जूनचे आकडे येणे बाकी आहे. जर हा आकडा 126 च्या वर गेला तर डीए वाढ 4 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते.
सध्या महागाई भत्ता 34 टक्के
एआयसीपी इंडेक्सचा डेटा श्रम आणि रोजगार मंत्रालयाने जानेवारी आणि जुलैमध्ये जारी केला आहे. या आधारे महागाई भत्ता वाढविला जातो. जानेवारी 2022 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के DA वाढीची भेट मिळाली आहे. सध्या त्यांचा एकूण डीए 34 टक्के आहे. आता जुलैचा महागाई भत्ता (पुढील डीए वाढ) ऑगस्टमध्ये जाहीर केला जाऊ शकतो.
कर्मचाऱ्यांना डीए का दिला जातो?
केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहणीमानाचा स्तर सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. महागाई वाढली असली तरी कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात कोणताही फरक पडू नये. म्हणूनच हा भत्ता दिला जातो.