7th Pay Commission : सरकारी नोकरी (Government Jobs) म्हणजे सुख, असं अनेकदा ऐकायला मिळतं. बरीच मंडळी हे असं नेमकं का म्हणतात, हे लक्षात आणून देतो तो म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आकडा. अनेकदा मूळ वेतन कमी असूनही पगारात जोडल्या जाणाऱ्या विविध भत्त्यांमुळं हाती येणारा एकूण पगार इतका वाढतो की, सरकारी नोकरीचा हेवा वाटणं स्वाभाविक ठरतं. देशभरातून लाखो कर्मचारी सध्याच्या घडीला सरकारी अख्तयारित येणाऱ्या विविध विभागांमध्ये सेवेत असून, त्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी ऐन गणेशोत्सवात आनंदाची बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारा सातवा वेतन आयोग आता लागू करण्यात येणार असून, केंद्र सरकार येत्या दिवसांमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या आनंदाच्या बातमीची अधिकृत घोषणा करणार आहे. जवळपास निश्चित झालेल्या या निर्णयानुसार पुढील 15 दिवसांणध्ये म्हणजेच सप्टेंबर महिना संपण्यापूर्वीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात (DA Hike) DA अर्थात ( Dearness Allowance ) महागाई भत्ता वाढणार असल्याची घोषणा होऊ शकते. 


यंदाच्या वर्षी हा भत्ता 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. जुलै 2024 पासून तो लागू राहणार असून, सध्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 50 टक्के महागाई भत्त्याचा आकडा नव्या तरतुदीनंतर 53 टक्क्यांवर पोहोचण्याची दाट शक्यता आहे. अधिकृत घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारात (Salary) मागील तीन महिन्यांचा भत्ताही देण्यात येणार आहे. त्यामुळं आता 15 ते 24 सप्टेंबरच्या काळात केंद्राकडून केल्या जाणाऱ्या घोषणांवरच सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष असेल असं म्हणणं गैर ठरणार नाही. 


हेसुद्धा वाचा : 'निवृत्तीनंतरची ‘सोय’...', चंद्रचूडांवर ठाकरेंच्या सेनेची टीका! म्हणाले, 'शेवटचा खांब मोदींनी...'


 


यंदाच्या वर्षी दसरा 12 ऑक्टोबर रोजी असून, सरकारकडून दसऱ्याआधीच महागाई भत्तावाढीसंदर्भातील घोषणा केली जाऊ शकते. एआयसीपीआय इंडेक्समधील आकडेवारीनुार जून 2024 च्या आकड्यांवरून हे सिद्ध होत आहे की, महागाई भत्त्यामध्ये वाढ होणं सुस्पष्ट आहे. त्यामुळं ती 3 टक्के महागाई भत्तेवाढ आता कर्मचाऱ्यांच्या पगारात भर टाकणार हे नक्की. त्यामुळं आता ऑक्टोबर महिन्याचा पगार जमा झाल्यानंतर बँकेचं स्टेटमेंट नक्की तपासून पाहा...