गांधीनगर : गुजरातच्या (Gujarat) तापी जिल्ह्यात (Tapi district ) झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झालेत. तर २३ हून अधिक जण जखमी झालेत. बस, टँकर आणि जीपमध्ये हा अपघात झाला. जखमींना व्यरा आणि सोनगढच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलाचा टँकर महामार्गाच्या चुकीच्या बाजूने जात होता. टॅंकर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. रस्ता अपघातात तेलाच्या टँकरने गुजरात राज्य परिवहन बसेसला जोरदार धडक दिली, अशी माहिती गुजरात राज्य परिवहनच्या एका अधिकाऱ्याने दिली.


तेलाचा टँकर सोनगडहून सूरतकडे जात होता, कुशलगड येथून येणारी बस उकाईकडे जात होती. तापी जिल्ह्यातील सोनगड तालुक्यातील पोखरण गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५६ वर हा अपघात झाला. धडक टाळण्यासाठी बसच्या चालकाने ब्रेक लावले असता बसला मागून जात असलेल्या जीपने जोरदार धडक दिली. जखमींना व्यारा आणि सोनगडमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


0