राज्यसभेतील 87% उमेदवार करोडपती
राज्यसभेची आगामी निवडणूक लढवणारे 87 टक्के उमेदवार हे करोडपती आहेत. तिथेच जदयूचे महेंद्र प्रसाद यांच्याकडे 4,078 करोड रुपये संपत्ती असून ते सर्वात अमीर उमेदवार आहेत. एडीआरमार्फत ही यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीच्या जया बच्चन यांच्याकडे 1001 करोड रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तसेत जनता दल सेक्यूलरच्या बी एम फारूक यांच्या जवळ 766 करोड रुपयांहून अधिक संपत्ती. तर काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडे 640 करोड रुपये संपत्ती आहे. तेदेपाचे सी एस रमेश यांच्याकडे 258 करोड रुपयांहून अधिक संपत्ती आहे.
मुंबई : राज्यसभेची आगामी निवडणूक लढवणारे 87 टक्के उमेदवार हे करोडपती आहेत. तिथेच जदयूचे महेंद्र प्रसाद यांच्याकडे 4,078 करोड रुपये संपत्ती असून ते सर्वात अमीर उमेदवार आहेत. एडीआरमार्फत ही यादी जाहीर करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीच्या जया बच्चन यांच्याकडे 1001 करोड रुपयांहून अधिक संपत्ती आहे. तसेत जनता दल सेक्यूलरच्या बी एम फारूक यांच्या जवळ 766 करोड रुपयांहून अधिक संपत्ती. तर काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडे 640 करोड रुपये संपत्ती आहे. तेदेपाचे सी एस रमेश यांच्याकडे 258 करोड रुपयांहून अधिक संपत्ती आहे.
झारखंड : राज्यसभेच्या एका जागेसाठी दोन करोडपतींमध्ये टक्कर
झारखंड राज्याच्या एका जागेसाठी सत्तारूढ भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने आपापले करोडपती उमेदवार एकमेकांच्या समोरा - समोर उभे केले आहेत. राज्यात राज्यसभेसाठी दोन जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे. भाजपच्या दोन उमेदवारांपैकी एक समीर ओरांव यांचा विजय निश्चित असल्याचं म्हटलं जातंय. कारण विधानसभेत पक्षाजवळ जास्त संख्या आहे. मात्र आपला दुसरा उमेदवार करोडपती प्रदीप सेंथलिया यांना जिंकवण्यासाठी अपक्ष आणि विपक्ष यांच्यातील एकता तोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या नामांकन पत्रात सेंथलियाने 28 करोड रुपये संपत्ती असल्याची घोषणा केली आहे. ही संपत्ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. काँग्रेस उमेदवार धीरज साहूने आपली आणि आपली पत्नीच्या नावावर 18 करोड रुपयांच्या संपत्तीची घोषणा केली आहे. दोघांनाही झारखंडमधील लोकप्रिय व्यापारी म्हणून ओळखले जातात.
कर्नाटक : राज्यसभेच्या निवडणुकीत जेडीएस उमेदवार सर्वात श्रीमंत
कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीत जनता दल सेक्युलरचे उमेदवार बी एम फारूकने आपली संपत्ती घोषित केली असून ती 770 करोड रुपये असल्याचं सांगितलं आहे. चार जागांसाठी पाच उमेदवार मैदानात असल्यामुळे फारूक सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. ईसीमध्ये दाखल झालेल्या माहितीनुसार, 51 वर्षीय फारूक यांच्या जवळ 770 करोड रुपये संपत्ती असून 600 करोड रुपये अचल संपत्ती आणि 95 लाख रुपये बँकेत जमा रक्कम सहभागी आहे.
तेथे काँग्रेसचे एल हनुमनथैया, जी सी चंद्रशेखर आणि सैयद नासिर हुसैन, भारतीय जनता पार्टीचे राजीव चंद्रशेखर हे निवडणुकीच्या मैदानात आहे. राजीव यांचा अपक्ष म्हणून पहिला कार्यक्रम 2 एप्रिल रोजी होणार आहे. भाजपचे 53 वर्षाचे राजीव चंद्रशेखर दुसरे सर्वात अमीर उमेदवार आहे. त्यांच्याकडे 50 करोड रुपये संपत्ती आहे.