बंगळुरु : कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नाराज झालेल्या नेत्यांची समजूत काढण्य़ाचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचे मंत्री देखील जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. जेडीएसचे 2 मंत्री देखील खातेवाटपावरुन नाराज आहेत. हे सगळं सुरु असतानाच आता शिक्षण मंत्र्यांच्या शिक्षणावरुन कर्नाटकात नवा वाद पेटला आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी जेडीएसचे वरिष्ठ नेता जीटी देवगौडा यांना उच्च शिक्षण मंत्री बनवलं आहे. देवगौडा यांनी मिळालेल्या खात्याबद्दल नाराजी व्यक्ती केली आहे. पण सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला तो मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 8वी पास नेत्याला उच्च शिक्षण मंत्री बनवलं आहे. चामुंडेश्वरी सीटवरुन माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांचा गौडा यांनी पराभव केला. पण ते फक्त 8 वी पास आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यावर स्पष्टीकरण देतांना म्हटलं की, कोणत्याही नेत्याच्या तालीमशी त्याच्या विभागाचं काही देणं घेणं नाही. त्यांना अनुभव काम करतो. त्य़ांनी स्वत:चं उदाहरण देत म्हटलं की, मी कुठे अभ्यास केला पण मी कर्नाटकचा मुख्यमंत्री झालो.'


8वी पास आहेत जीटी देवगौडा


कमी शिक्षणामुळे जीटी देवगौडा यांना हे मंत्रालय मिळाल्याने ते नाराज आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांना पराभूत केल्यानंतर गौडा यांना मोठं खातं हवं होतं. जीटी देवगौडा एक शेतकरी देखील आहेत. देवगौडा 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2004 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2007 मध्ये ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर 2013 मध्य़े त्यांनी जेडीएसमध्ये प्रवेश केला.