Budget 2023: अर्थमंत्र्यांकडून 8 वा वेतन आयोग लागण्याची शक्यता? सरकारी कर्मचाऱ्यांना काय मिळणार..
8th Pay Commission: येत्या तीन दिवसातच अर्थमंत्री निर्मला सितारामन या केंद्रीय बजेट (Central Budget) सादर करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष त्याकडे लागलेले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलंय ते म्हणजे वेतनधारकांना.
8th Pay Commission: येत्या तीन दिवसातच अर्थमंत्री निर्मला सितारामन या केंद्रीय बजेट (Central Budget) सादर करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष त्याकडे लागलेले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलंय ते म्हणजे वेतनधारकांना. यावर्षी नक्की कोणते बदल होतील, याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. येत्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सातव्या आयोगावरून (7th Pay Commission) आठव्या वेतन आयोगाकडे वळणार का याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. तेव्हा जाणून घेऊया नक्की याबद्दल कुठल्या चर्चा आहेत. अशी माहिती कळते आहे की येत्या 1 फेब्रुवारीच्या बजेटमधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister) या सातव्या वेतन आयोगावरून आठव्या वेतन आरोगाकडे येऊ शकतात. (8th pay commission may be annouced in the upcoming budget know how what will government employees may get)
सध्या देशात सातवा वेतन आयोग सुरू आहे त्यामुळे त्यातून देशात 8 वा वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही अनेकदा होताना दिसली आहे त्यामुळे येत्या बजेटमधून लोकांना 8 वा वेतन आयोग लागू व्हावा अशीही अपेक्षा आहे. येत्या चार दिवसांमध्येच अर्थसंकल्प (Budget by Niramala Sitaraman) सादर होणार आहे त्यामुळे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोग जारी व्हावा अशी चर्चा सुरू झाली आहे.
लोकाभुमिख अर्थसंकल्प...
2024 च्या निवडणूकांच्या उद्देशानं हा अर्थसंकल्प लोकाभिमूख (Public Oriented) असेल तेव्हा त्यानूसार प्रयत्न केले जाणार आहेत. तेव्हा या अर्थसंकल्पात पगारवाढीवरही (Salary Hike) मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. काही जुन्या मागण्या (Demands) या अर्थसंकल्पातून पुर्ण होण्याची अपेक्षा आहे.
8 व्या वेतन आयोगाचे फायदे काय?
देशात जर का 8 वा वेतन आयोग लागू झालाच तर त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी जर का 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू झालाच तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ मिळू शकते. त्याचसोबतच लहान स्तरातील कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना मोठी पगारवाढ मिळू शकते.
कर्मचाऱ्यांचे वेतन, वेतनश्रेणी आणि भत्ते वेतन आयोगाच्या आधारे निश्चित केले जातात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सरकारनं 8 वा वेतन आयोग आणल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. सध्या 7 व्या वेतन आयोगानुसार हे वेतन कर्मचाऱ्यांना दिले जाते आहे. यानं फिटमेंट फॅक्टरही (Salary Fitment) वाढू शकतो. त्याच्या वाढीमुळे पगारातही आपोआप वाढ निश्चित होईल.
वेतन आयोग तर दहा वर्षांनी येतो. आत्तापर्यंत 5 व्या, 6 व्या, आणि 7 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे 2023 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केला जाईल आणि त्याची शिफारस 2026 मध्ये लागू केल्या जातील असा अंदाजही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला होता.