छतरपूर : मॅगी आरोग्याला घातक असल्याने याआधी बंदी घालण्यात आली होती. अजीनोमोटो प्रमाणापेक्षा जास्त असल्या कारणाने ही बंदी घालण्यात आली होती. आरोग्याला अजीनोमोटो एकदम घातक आहे. याचा वापर मॅगीमध्ये प्रामुख्याने चव येण्यासाठी करण्यात येतो. पुन्हा एकदा मॅगी घातक असल्याचे पुढे आलेय. मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे काल रात्री रात्री मॅगी खल्ल्यानंतर एका कुटुंबातील ९ मुले आजारी पडली. मॅगीची बाधा झाल्याने सर्व मुलांना ग्वॉल्हेर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



मॅगीवर बंदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. प्रकृती बिघडलेल्या नऊ मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे मॅगीच्या गुणवत्तेबाबत पुन्हा शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी मॅगी नूडल्स आरोग्यास अपायकारक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर २०१५ मध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. 'अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन' (एफएसडीए) या संस्थेने गोळा केलेल्या मॅगीच्या नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक शिसे (लेड) आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळून आले होते.  


धोकादायक घटक


यामुळे देशभरातून मॅगीच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अनेक राज्यांमधून मॅगीचे नमुने गोळा करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्रमाणापेक्षा १७ टक्के अधिक शिसे आढळले होते.  रक्तामध्ये शिसेचे प्रमाण अधिक आढळल्यास कॅन्सर, मेंदूचे विकार, किडनीचे आजार होण्याची शक्यता असते.तसेच लहान मुलांच्या डोक्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते.