रेल्वे मंत्र्यांची खोटी सही करण्यासाठी घ्यायचा ९ लाख
खोटी सही करणाच्या आरोपात दोघांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची खोटी सही करणाच्या आरोपात दोघांना अटक करण्यात आली आहे. माजी सरकारी कर्मचारी रमण जोशी तर दूसरा सिविल इंजिनियर थलेसेट्टी सुधाकर यांना याप्रकरणी अटक झाली आहे. आरपीएफ पोलीस विशोक गुप्ता यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
रेल्वे मंत्र्यांच्या खोट्या सह्या केल्या त्यावर मल्लिकार्जुन वाडला नाव लिहिलं होत असल्याचे तक्रारी आल्याचे गुप्ता यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांची एक टीम वाडलाच्या चौकशीसाठी सिकंदराबाद गेली आहे.
१० लाखाची लाच
रेल्वे कमिटीचे लाइफ मेंबरशिप कार्ड बनविण्यासाठी सुधाकरला १० लाख रुपये दिल्याचे वाडलाने सांगितले. सुधारकने वाडला याला डॉक्यूमेंट देऊन रेल्वे मंत्रालयाकडून शहानिशा करायला सांगितले. सुधाकरने खोट्या सह्या केल्याचे लक्षात येताच २३ ऑगस्टला त्याला अटक करण्यात आली.
वाडलाकडून मिळालेल्या १० लाखातील ९ लाख जोशीला दिले गेले होते. जोशीला देखील दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
हे दोघे आरोपी रेल भवन येथे भेटले होते. त्यावेळी सुधाकर काही सरकारी कॉन्ट्रॅक्टच्या शोधात दिल्लीला आला होता.