मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे आता एक नवीन समस्या समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. अशा परिस्थितीत दारु अभावी नऊ जणांनी आत्महत्या केली आहे. यामुळे स्थानिक सरकारसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. आता राज्य सरकार आपल्या नियमांमध्ये बदल करणार आहे जेणेकरुन दारू सहज उपलब्ध होईल.


९ जणांनी आत्महत्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे लोकांना दारु मिळत नाहीये. त्यामुळे केरळमध्ये आतापर्यंत पाच आणि कर्नाटकमधील चार जणांनी दारू न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहेत. डॉक्टर म्हणतात की, संपूर्ण राज्यात फक्त महत्त्वाच्या सेवांशिवाय सर्व दुकाने बंद केल्याचा सर्वात वाईट परिणाम मद्यपान करणाऱ्यांवर झाला आहे.


केरळ सरकारने नियम बदलले


लॉकडाऊन दरम्यान झालेल्या आत्महत्येच्या घटनांमुळे केरळ सरकारला नियम बदलण्यास भाग पाडले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी म्हटलं की, कोरोना विषाणूमुळे राज्यात फक्त एकच मृत्यू झाला आहे. पण लॉकडाऊनमध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केले की आता उत्पादन शुल्क विभाग दारूचे व्यसन असलेल्या लोकांना मद्य पुरवणार आहे. याशिवाय राज्य सरकार दारू पुरवण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरू करणार आहे.