Woman Beaten To Death By Grandson: दिल्लीमधील (Delhi) प्रेम नगरमध्ये एका वयस्कर महिलेची बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामधील आरोपी हा या महिलेचा नातूच (Grandson) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय शाहरुख नावाच्या व्यक्तीने आपल्या 90 वर्षीय आजीची हत्या केली. शाहरुखला त्याची आजी दारु पिण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करायची. दारु पिऊ नकोस असं त्याची आजी त्याला नेहमी सांगायची. यावरुन त्यांच्यात वारंवार वाद व्हायचा. अशाच एका वादातून त्याने आपल्या आजीला संपवलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.


पोलिसांना आला फोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार 12 फेब्रुवारी रोजी घडला. पोलिसांना प्रेम नगरमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आल्याची माहिती फोनवरुन मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना तिथे 90 वर्षीय रायसा नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. पोस्टमार्टमसाठी रायसा यांचा मृतदेह पाठवण्यात आला असून या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हत्येची माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा मोबाईल क्रमांक बंद होता.


आजीला मारहाण केली अन्...


हा फोन क्रमांक मीणा नावाच्या महिलेच्या नावाने रजिस्टर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र मीणाचं घर पोलिसांना बंद असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी या मृत महिलेचा नातू शाहरुखला अटक केली. शाहरुखने आपला गुन्हा कबुल करताना हे सारं घडलं तेव्हा आपण दारुच्या नशेत होतं असं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं. वादादरम्यान आपण आपल्या आजीला मारहाण केल्याचं शाहरुखने सांगितलं. आपण मारहाण केल्यानंतर आपण आजीला धक्का दिला तेव्हा तिचा मृत्यू झाला असं शाहरुख म्हणाला.