देशाला `खुळखुळा` करणारे ९३३९ कर्जदार... `एसबीआय` येणार गोत्यात?
नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० करोड रुपयांचा घोटाळा करून पसार झालाय. विजय माल्या एसबीआयसमवेत इतर बँकांचे ८००० करोड रुपये घेऊन पळाला. विक्रम कोठारीलाही कर्ज देऊन अनेक बँका फसल्यात... ही काही उदाहरण आहेत जे आत्तापर्यंत समोर आलेत. परंतु, देशाला खुळखुळा बनवणाऱ्यांमध्ये तब्बल ९३३९ कर्जदारांचा समावेश आहे. या लोकांनी भारतीय बँकांचे तब्बल १ लाख ११ हजार ७३८ करोड रुपये जाणूनबुजून रखडवलेत.
नवी दिल्ली : नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० करोड रुपयांचा घोटाळा करून पसार झालाय. विजय माल्या एसबीआयसमवेत इतर बँकांचे ८००० करोड रुपये घेऊन पळाला. विक्रम कोठारीलाही कर्ज देऊन अनेक बँका फसल्यात... ही काही उदाहरण आहेत जे आत्तापर्यंत समोर आलेत. परंतु, देशाला खुळखुळा बनवणाऱ्यांमध्ये तब्बल ९३३९ कर्जदारांचा समावेश आहे. या लोकांनी भारतीय बँकांचे तब्बल १ लाख ११ हजार ७३८ करोड रुपये जाणूनबुजून रखडवलेत.
विविध बँकांनी कर्जाच्या स्वरुपात दिलेली ही रक्कम आहे. कर्जाची ही रक्कम ज्या ९३३९ कर्जदारांनी घेतलीय ते हे कर्ज फेडू शकतात... परंतु, ते हे जाणूनबुजून टाळत आहेत. अशा लोकांना 'विलफुल डिफॉल्टर' म्हटलं जातं.
सरकारी बँकाही अडकल्या
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड (सीआयबीआयएल) कडून मिळालेल्या डाटानुसार, कर्जाचा या आकड्यात सरकारी बँकांचे ९३,३५७ करोड रुपये अडकलेत. २०१३ साली ही रक्कम २५,४१० करोड रुपये होती. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत यामध्ये तब्बल ३४० टक्के वाढ झालीय.
कर्जदारांचे नाव गुलदस्तात
इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, आरबीआयनं आत्तापर्यंत सर्व कर्जदारांच्या नावांची यादी जाहीर केलेली नाही. गेल्या वर्षी आरबीआयनं सुप्रीम कोर्टात म्हटल्याप्रमाणे, कर्जदात्यांच्या नावाची लिस्ट सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही. यामध्ये सरकारी बँकांकडून ५०० करोड रुपयांहून अधिक कर्ज घेतलेलं आहे.
'पीएनबी'चे 'विलफुल डिफॉल्टर्स'
११,४०० करोड रुपयांचा घोटाळ्यानंतर चर्चेत आलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे १२,५७४ करोड रुपये 'विलफुल डिफॉल्टर्स'कडे अडकलेले आहेत. यामध्ये,
विनसम डायमंड : ८९९ करोड रुपए
नेफ्ड : २२४ करोड रुपए
अॅपल इंडस्ट्रीज : २४८ करोड रुपए
'एसबीआय'चे सर्वात जास्त कर्जदार
सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)मध्ये 'विलफुल डिफॉल्टर्स'ची संख्या सर्वात जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या १६६५ कर्जदारांकडे (विलफुल डिफॉल्टर्स) २७,७१६ करोड रुपयांचं कर्ज आहे.
किंगफिशर एयरलाइन : १२८६ करोड रुपए
कॅलिक्स केमिकल्स : ३२७ करोड रुपए
जेबी डायमंड : २०८ करोड रुपए
स्पॅन्को : ३४७ करोड रुपए
जेनिथ बिर्ला : १३९ करोड रुपए
श्रीम कॉर्पोरेशन : २८३ करोड रुपए
झूम डेव्हलपर्स : ३७८ करोड रुपए
फर्स्ट लिजिंग : ४०३ करोड रुपए
जेट इंजिनियरिंग : ४०६ करोड रुपए
'आयडीबीआय'ची स्थिती सारखीच...
आयडीबीआय बँकेच्या खात्यात ८३ विलफुल डिफॉल्टर्स आहेत. त्यांनी एकूण ३६५९ करोड रुपयांचं कर्ज घेऊन ठेवलंय. यामध्ये...
रेड अॅन्ड टेलर : २०६ करोड
एस कुमार नेशनवाइड : ८३४ करोड
डेक्कन क्रॉनिकल : २६९ करोड
'बँक ऑफ इंडिया'चं काय?
बँक ऑफ इंडियाच्या एकूण ३१४ विलफुल डिफॉल्टर्सनं ६१०४ करोड रुपयांचं कर्ज घेतलंय.
रेड अॅन्ड टेलर : २३६ करोड
फॉरेवर प्रेशयस डायमंड : १५८ करोड
मोहन जेम्स : १५८ करोड
'बँक ऑफ बडोदा'चीही फसवणूक
बँक ऑफ बडोदाचे ४३२ करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्स आणि ३६२ करोड रुपये एबीसी कॉटस्पिननं अजूनही फेडलेले नाहीत.
'इंडियन एक्सप्रेस'च्या माहितीनुसार, बँकांनी १६८४४ एनपीए खाताधारकांविरुद्ध रितसर तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या सर्वांवर एकूण २,५९,९९१ करोड रुपयांचं कर्ज आहे. एसबीआयकडे सर्वात जास्त 'विलफुल डिफॉल्टर्स' आहेत. त्यांच्या ३६८४ कर्जदारांवर ७४,६४९ करोड रुपयांचं कर्ज आहे.