VIDEO: वय वर्षे 97! वयस्कर आजीचा अॅडव्हेन्चर; साडी नेसून केलं पॅराग्लायडिंग, आनंद महिंद्रा म्हणतात...
Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: सध्या वयस्कर महिलाही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. वयाच्या 97 व्या वर्षी चक्क या महिलेनं पॅराग्लायडिंग केलं आहे.
Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: वयाला कुठलेच बंधन नसते. आपण आपल्या कुठल्याही वयात अनेक कामं अगदी सहजतेनं करू शकतो असं अनेक लोकांनी सिद्धही करून दाखवलं आहे. सध्या अशाच एका आजीबाईंचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून खुद्द उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याच्या या व्हिडीओची बरीच चर्चाही रंगलेली आहे. यावेळी 97 वर्षांच्या आजीबाईंनी चक्क पॅराग्लायडिंग केलं आहे. त्यामुळे त्यांची बरीच चर्चाही रंगलेली आहे. सध्या त्यांचा हा रोमांचकारी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे आणि खुद्द आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांच्या या व्हिडीओखाली अनेकांनी नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत.
60 ओलांडली की अनेक जणं हे निवृत्ती घेतात. परंतु सध्या आपण पाहतो आहोत की 60 ओलांडली की देखील अनेक लोकं नवीन गोष्ट शिकतात, ती अनुभवतात त्यामुळे त्यांची अनेकदा स्तुती होताना दिसते. अशांना प्रेरणा घ्यावी तेवढीच कमी आहे. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा असते. अनेक जणं जगभ्रंमतीही करताना दिसतात.
तर या वयात अनेक जणं आपला लाईफ पार्टनरही शोधताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर या वयातील अनेक महिला ट्रेण्डिंग गाण्यावर रील्सही करताना दिसतात. त्यामुळे तरूणपिढीही त्यांच्याकडे पाहून त्यांचा आदर्श घेताना दिसते. अनेकदा काही कारणांमुळे आपल्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी या आपल्यालाही पुर्ण करायच्या असतात. त्यासाठी आपण जीवनाचं रान करतो आणि आपण हे केलंच पाहिजे.
हेही वाचा: बालकलाकार म्हणून गाजलेल्या अभिनेत्याचा साखरपुडा संपन्न; स्पृहा जोशी म्हणाली, '...पण मुलगा चांगला आहे'
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तुम्ही कोणत्याही वयात उड्डाण घेऊ शकता, ''आज या माझ्या हिरो आहेत. असं कॅप्शन लिहलं आहे.'' या वयस्कर आजींनी यावेळी पांढरी शुभ्र साडी नेसली होती. यावेळी एका सहकाऱ्याच्या मदतीनं आल्या. त्यानंतर त्यांनी हेल्मेट आणि गॉगलही घातले.
यावेळी सर्वच जणं या आजीबाईंचं कौतुक करताना दिसत आहे. यावेळी हा व्हिडीओ 3 लाख लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. यावेळी आजीबाईंनी उंचीवर जमिनीवरचा सुंदर नजरा पाहिला. नक्कीच त्यांनी हा क्षण आपल्या आठवणीत कोरून ठेवला असेल.