परिक्षेला बसू न दिल्याने ९ वी तील विद्यार्थींनीची आत्महत्या....
माणूसकीला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे.
हैद्राबाद : माणूसकीला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. हैद्राबादमधील एका शाळेत विद्यार्थींनीने फी न भरल्यामुळे तिला अत्यंत वाईट अपमान करण्यात आला. तो तिच्या इतका जिव्हारी लागला की तिने आपली जीवनयात्रा संपवली.
काय आहे हे प्रकरण?
मीडिया रिपोर्टनुसार, ९ वीच्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला फी न भरल्यामुळे परीक्षेला बसू दिले नाही आणि वर्गाच्या बाहेर उभे राहण्यास सांगितले. संध्याकाळी घरी परतल्यानंतर ती खूप अस्वस्थ होती. शाळेत मिळालेल्या वर्तवणूकीमुळे ती खजिल झाली होती. तिने शाळेतील सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला.
सुसाईड नोट सापडली
गुरूवारी संध्याकाळी तिने आपल्या घरात फाशी लावून आत्महत्या केली. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहिला मिळाला. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, ''त्यांनी मला परिक्षा देवू दिली नाही, सॉरी आई...'' या प्रकरणी पोलीसांनी शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.